महार बटालियनच्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाण्यात भव्य मिरवणूक; पाहा व्हिडिओ - Mahar Regiment Foundation Day - MAHAR REGIMENT FOUNDATION DAY
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 1, 2024, 2:28 PM IST
बुलढाणा Mahar Regiment Foundation Day : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या अथक प्रयत्नानं 1 ऑक्टोबर 1941 रोजी महार रेजिमेंटची स्थापना झाली. या रेजिमेंटच्या 84 व्या वर्धापन दिनानिमित्त यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ आणि महार रेजिमेंटच्या वतीनं विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलय. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात देखील 84 वा महार बटालियन वर्धापन दिन साजरा केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महार बटालियनमध्ये कर्तव्यावर असलेल्या माजी सैनिकांनी हुतात्मांच्या स्मारकावर जाऊन मानवंदना दिल्यानंतर बुलढाणा शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला संरक्षण विश्लेषक मेजर जनरल संजय सी मेस्टन, सुभेदार मेजर रामभाऊ इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचं आयोजन यश सिद्धी सैनिक संघानं केलं होतं.