अनोखा रामभक्त; दररोज 500 वेळा लिहतो रामनाम, आतापर्यंत 50 लाख वेळा 'राम' लिहिल्याचा दावा - अयोध्या राम मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 28, 2024, 11:27 AM IST
लखनऊ Lord Ram Unique Devotee : प्रभू रामाचं दररोज 500 वेळा नाव लिहणारा अनोखा रामभक्त राम नामाचा जप करत आहेत. या रामभक्ताचा हा उपक्रम मागील 25 वर्षापासून अविरत सुरू आहे. आतापर्यंत 50 लाख वेळा रामाचं नाव लिहिल्याचा दावा या रामभक्तानं केला आहे. "रामभक्तीतून आपल्याला अपार आनंद मिळतो," असं या रामभक्तानं स्पष्ट केलं आहे. "आयुष्यभर हे काम करत रहावं, अशी इच्छा आहे," असं या रामभक्तानं यावेळी सांगितलं असून हे रामभक्त अमेठी इथले आहेत. अमेठी जिल्ह्यातील निजामुद्दीनपूर गावात रामचंद्र यादव हे रामभक्त राहतात. त्यांनी आपलं जीवन भगवंताच्या भक्तीसाठी समर्पित केलं आहे. "भागवत कथा ऐकून आणि महंतांच्या सानिध्यात राहून राम नाव लिहण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळं आपल्याला अपार आनंद मिळतो. अयोध्या नगरीत मंदिर बांधल्यानं आमचं जीवन धन्य झालं. वहीत पेनानं राम नाव लिहतो," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.