बेस्ट बस अनियंत्रित झाल्यानं अनेकांना चिरडलं, अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर - KURLA BEST BUS ACCIDENT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 10, 2024, 7:10 AM IST
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी (9 डिसेंबर) रात्री झालेल्या भीषण अपघातात (Kurla Best Bus Accident) चार जणांचा मृत्यू झाला. तर 25 जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. मृत आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याचा अंदाज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला (पश्चिम) येथील एसजी बर्वे मार्गावरील अंजुमन-ए-इस्लाम शाळेसमोर रात्री 9.50 वाजता हा अपघात झाला. यावेळी एका अनियंत्रित बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिली. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. ब्रेक फेल झाल्यामुळं बस सुसाटपणे रस्त्यावरून जात असल्याचं या व्हिडिओत बघायला मिळतंय.