आद्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी केली विधीवत पूजा - Avimukteshwaranand at Matoshree - AVIMUKTESHWARANAND AT MATOSHREE
🎬 Watch Now: Feature Video


Published : Jul 15, 2024, 10:18 PM IST
मुंबई Shankaracharya Avimukteshwaranand at Matoshree : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आद्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मातोश्री या निवासस्थानी बोलून विधिवत पूजा केली. तसंच स्वामी यांच्याकडून शुभ आशीर्वाद घेतले. यावेळी मातोश्रीवर विधिवत पूजा झाल्यानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी अविमुक्तेश्वरानंद यांना नमस्कार करुन, त्यांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान, आद्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या शाही विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या शाही विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते. यावेळी आद्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना नमस्कार करुन मोदींनी आशीर्वाद घेतले होते. यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आद्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मातोश्री इथं बोलावून विधिवत पूजा केली. यावेळी खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते.