वाफळलेल्या चहाचा घोट घेत कलाकारांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा - Aathvanitla Chaha Program In Nashik
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 20, 2024, 9:44 PM IST
नाशिक Aathvanitla Chaha Program : नाशिकची सकाळची बोचरी थंडी, कॉलेज जीवनातील आठवणी, जुन्या मित्रांच्या भेटी, सोबतीला वाफाळलेला चहा अन् आठवणींत मित्रमंडळी पुन्हा एकदा कॉलेज रोडवर रमले होते. नाशिकच्या जनस्थान आणि सलीम गृपतर्फे आज 'आठवणीतला चहा' या अभिनव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाचे हे ६ वे वर्ष आहे. यावेळी गप्पागोष्टी, बासरी वादन, गायन, हास्य कल्लोळ अनुभवयास मिळाला. यावेळी नाशिकमधील दिग्गजांनी याठिकाणी येत आनंद घेतला.
टीव्ही मालिकांमधील कलाकार सहभाग : नाशिककर गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. अशात गेल्या काही वर्षांपासून जनस्थान ग्रुपच्या सदस्यांनी कॉलेज रोडवरील सलीम चायच्या टपरीवर एकत्र जमत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 'आठवणीतला चहा' हा कार्यक्रम सुरु केला आहे. यावेळी प्रत्येक सदस्यांनी आपल्या गत जीवनातील काही स्मृती या चाय टपरीसोबत कशा घनिष्ठ राहिलेल्या आहेत, त्या अनुभवांची शिदोरी यावेळी उघडली. यावेळी टीव्ही मालिकांमधील कलाकार, चित्रकार, गायक, लेखक, संगीतकार, नृत्यकार, कवी, निवेदक तसेच राजकीय नेते सहभागी झाले होते.