गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवरुन केलं सर्वांना अभिवादन - Govinda Will Get Discharge - GOVINDA WILL GET DISCHARGE
🎬 Watch Now: Feature Video


Published : Oct 4, 2024, 1:47 PM IST
|Updated : Oct 4, 2024, 2:53 PM IST
मुंबई - हिंदी चित्रपटाचा स्टार गोविंदा सध्या मुंबईत रुग्णालयात भरती झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील अंधेरी जुहू क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती काही वेळापूर्वी त्याची पत्नी सुनिता आहुजा यांनी माध्यमांना दिली होती. दुपारी त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळणार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. अखेर गोविंदा रुग्णालयातून बाहेर पडला असून चाहत्यांनी त्याचं रुग्णालयाच्या बाहेर जोरदार स्वागत केलं. पापाराझींनीही त्याला फोटोसाठी आग्रह धरला होता. व्हिलचेअरवर बसून गोविंदानं सर्वांना अभिवादन केलं.
उत्साह आणि चैतन्याचा झरा असलेला गोविंदा पायात चुकून गोळी लागल्यानं चार दिवसापासून उपचार घेत होता. आता गोविंदाची प्रकृती सुधारली आहे आणि आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तो बाहेर येताच त्याचं पुन्हा नृत्य सुरू राहील. गोविंदाच्या आईचे आशीर्वाद आणि लोकांच्या प्रार्थना यामुळे माझ्या पतीची तब्येत चांगली असल्याचं गोविंदाच्या पत्नी सुनिता म्हणाल्या.