गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त 18 जपानी साईभक्त महिला शिर्डीत; दर्शनानंतर काय म्हणाल्या? पाहा व्हिडिओ - Japanese In Shirdi - JAPANESE IN SHIRDI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 22, 2024, 2:27 PM IST
शिर्डी Gurupurnima In Shirdi : गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त (GURU PURNIMA 2024) रविवारी (21 जुलै) साईनगरी शिर्डी ही भक्तांनी गजबजली होती. यावेळी जपान येथील 18 साईभक्त महिलांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे यावेळी या सर्व महिला पारंपरिक भारतीय कपड्यांमध्ये दिसल्या. साईबाबा संस्थानच्या वतीनं या 18 जपानी साई भक्तांचा शॉल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मंदिराबाहेर भजनातही सहभाग घेतला. दरम्यान, गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त 3 दिवसांसाठी या सर्व महिला शिर्डीत आल्या होत्या. दरम्यान, साईबाबा हयात असल्यापासून गुरूपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यामुळं या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीत येऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतात. यंदाही गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन साईबाबा संस्थानच्यावतीनं करण्यात आलं होतं.