मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान त्याचा आगामी चित्रपट 'लवयापा'च्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी जुनैद खान आणि खुशी कपूर स्टारर चित्रपटाचा टायटल ट्रॅक आज, 3 जानेवारी रोजी रिलीज केला आहे. सोशल मीडियाच्या काळातील जुनैद आणि खुशी यांच्यातील मजेशीर केमिस्ट्री या गाण्यात दाखवण्यात आली आहे. नक्श अजीज आणि मधुबंती मधुबंती बागची यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. झी म्युझिक कंपनीनं इंस्टाग्रामवर या गाण्याची झलक शेअर केली आहे. यावर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'बाबू शोना करता करता डोक्याचा झाला भजियापा? 'लवयापा'ची सुरुवात आहे. 'लवयापा हो गया' हे गाणं रिलीज झालं आहे. 7 फेब्रुवारी 2025 पासून या व्हॅलेंटाईन आठवड्यात 'लवयापा' चित्रपटगृहात.'
'लवयापा'ची कहाणी : हा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होईल. 'लाल सिंग चड्ढा'चं दिग्दर्शन करणारा अद्वैत चंदननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, "लवयापा' ही प्रेमाची आणि गुंतागुंतीची कहाणी आहे. या चित्रपटामधील गुंतागुंतीमध्ये खूप मजा आणि विनोद आहेत, जे एक सिनेमॅटिक ट्रीट असणार आहे." आता मोठ्या पडद्यावर जुनैदला पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत.
जुनैद आणि खुशचं वर्कफ्रंट : जुनैदनं त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नेटफ्लिक्स चित्रपट 'महाराज'मधून केली. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर जयदीप अहलावत आणि शर्वरी वाघ हे कलाकार होते. सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स एंटरटेनमेंट अंतर्गत आदित्य चोप्रा निर्मित, हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील होता.या चित्रपटाची कहाणी 1862मधील महाराजांच्या मानहानी केसभोवती फिरणार आहे. दुसरीकडे दिवंगत श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी खुशीनं देखील नेटफ्लिक्समधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिनं झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटात काम केलं. यामध्ये ती शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाबरोबर दिसली होती. हा चित्रपट गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला होता.
हेही वाचा :