हैदराबाद Hero MotoCorp Sale 2024 : Hero Motocorp, कंपनीनं 2024 जबरदस्त विक्रिचे आकडे गाठले आहेत. 2024 मध्ये कंपनीनं एकूण 59 लाख 11 हजार 65 वाहनांची विक्री केलीय. ही विक्री 2023 च्या तुलनेत 7.5 टक्क्यानं अधिक आहे. या वाढीमध्ये ईव्ही आणि नवीन मॉडेल्सचा मोठा वाटा आहे.
2024 कंपनीसाठी ऐतिहासिक वर्ष : याबाबत Hero MotoCorp चे CEO निरंजन गुप्ता यांनी सांगितलं की, 2024 कंपनीसाठी ऐतिहासिक वर्ष होतं. कंपनी भविष्यात देखील नवीन उत्पादनं आणण्याची तयारी करत आहे. Hero MotoCorp नं 2024 मध्ये विक्रीचा नवा विक्रम केलाय. कंपनीनं 2023 मध्ये 54 लाख 99 हजार 524 वाहनांचा विक्री केली होती. मात्र, कंपनीनं 2024 मध्ये 59 लाख 11 हजार 65 वाहनांची विक्री केलीय. त्यामुळं कंपनीच्या वाहन विक्रीत 7.5 टक्क्यांन वार्षिक वाढ झालीय. यामागें कंपनीची वाढीची रणनीती कार्यरत आहे.
2025 मध्ये EV पोर्टफोलिओचा विस्तार : Hero MotoCorp नवीन वर्षात आणखी धमाकेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.कंपनी 2025 मध्ये EV पोर्टफोलिओचा विस्तार करणार आहे.पेट्रोल इंजिन, नवीन स्कूटर मॉडेल्ससह प्रमुख उत्पादनं कंपनी या वर्षी सादर करणार आहे. Hero MotoCorp भारतीय बाजारात 100 cc ते 440 पर्यंतच्या मोटरसायकल आणि स्कूटर विकते. Hero Splendor Plus हे कंपनीचं सर्वाधिक विकलं जाणारे मॉडेल आहे. यासोबतच, कंपनी HF100, HF Deluxe, Splendor Xtech, Super Splendor, Glamour, Passion, Extreme 125R, Extreme 160R, Xpulse, Karizma XMR, Maverick 440 यांसारख्या विविध सेगमेंटच्या मोटारसायकली तसंच झोम्स, प्लीआ, डेस्टिनी 125 आणि डेस्टिनी प्राइम सारख्या स्कूटर विकते.
हे वचालंत का :