ऐन लग्नातच पावसाचा धुमाकूळ...; धो धो पावसात नवरदेव-नवरीने केली एन्ट्री... पाहा व्हिडिओ - Wedding Ceremon
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 18, 2024, 10:08 PM IST
हिंगोली Wedding Ceremony : सध्या एकीकडं लग्न सराईची मोठी धुम सुरू आहे. तर दुसरीकडं मात्र, अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. यामुळं लग्न असणाऱ्या घरातील वऱ्हाडी लोकांची दमछाक होत आहे. दांडेगावात कदम आणि सोळंके परिवाराचा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडणार होता. परंतु नवरदेव नवरीची एन्ट्री होणार इतक्यातच अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली. पाहुणे मंडळींनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या. बसण्यासाठीच्या चटया डोक्यावर घेतल्या. पाऊस काही थांबत नव्हता आणि दुसरीकडं लग्नच्या शुभ मुहूर्ताची वेळ निघून जात असल्यानं, वधु आणि वरकडील दोन्ही मंडळींनी विवाह लावण्याचं ठरवलं आणि हा लग्न सोहळा पावसातच पार पडला. त्यामुळं या लग्न सोहळ्याची चर्चा गावात सुरू आहे.