देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी वर्णी आम्हाला त्याचा फार..., संकटमोचक गिरीश महाजन काय म्हणाले?

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : 8 hours ago

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी निवड केल्यानंतर भाजपामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी ५ डिसेंबरला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यासाठी ११ दिवस महायुतीमध्ये खलबतं झाली. याबाबत भाजपाचे संकट मोचक वरिष्ठ नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली आहे. 



यादरम्यान बोलताना गिरीश महाजन म्हणाले, "जनतेनं आम्हाला स्पष्ट आणि घवघवीत यश दिलं. त्यातच देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्याकारणानं आम्हाला त्याचा फार मोठा आनंद आहे. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. तीन पक्षांचं सरकार असल्याकारणानं काही निर्णय घ्यायला उशीर लागतो. गृहमंत्री पद त्यासोबत अर्थमंत्री पद कुठल्या पक्षाकडं असेल याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. आम्हाला ज्या पद्धतीचे आदेश येतील त्या आदेशांचं पालन करायचं आमचं काम आहे. यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विकासाची गंगा वाहिली आहे." 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.