पाटील कुटुंबाने गणेशोत्सवाच्या देखाव्यात साकारला महिला सुरक्षिततेचा प्रश्न, 'हा' दिला संदेश, पाहा व्हिडिओ - Gharguti Gauri Decoration - GHARGUTI GAURI DECORATION
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 12, 2024, 10:33 PM IST
ठाणे Gharguti Gauri Decoration : देशात आणि राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. यंदा ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपती देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. ठाण्यातील कोपरी गावातील हरीश पाटील यांच्या घरी देखील गणपतीसाठी केलेल्या देखाव्यात बदलापूर (Badlapur Case) येथे घडलेल्या अत्याचाराविषयी जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर अवयवदान, वाढतं प्रदूषण आणि जातीवाद याविषयी देखील जनजागृती करण्यात आली आहे.
देखाव्यात सामाजिक संदेश : पाटील कुटुंबीयांच्या गणपतीचे यंदाचे हे ५६ वे आहे. दरवर्षी पाटील कुटुंबीय गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध विषय हाताळत देखाव्याच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. ठाण्यात अनेक घरगुती आणि सार्वजनिक मंडळांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. अशा सामाजिक देखाव्याचा फायदा जनजागृतीसाठी आणि गुन्हे रोखण्यासाठी होऊ शकतो.