अभिजीत आणि सुखदा खांडकेकर यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान; पाहा व्हिडिओ - Abhijeet Khandkekar Ganpati - ABHIJEET KHANDKEKAR GANPATI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 7, 2024, 10:26 PM IST
नाशिक Ganeshotsav 2024 : 'गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया'ची धूम आज राज्यभर दिसून येत आहे. सार्वजनिक मंडळासोबतच घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. अगदीच सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते, सेलिब्रिटी यांच्या घरात आज गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. मुंबईत राहणारे अभिनेते अभिजीत आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी नाशिकला येत असतात. यंदा अभिजीतच्या घरी गणपती मंदिर आणि पैठणीची सुरेख आरास करण्यात आली आहे. बाप्पाचं जितक्या जल्लोषात आगमन होतं तितक्याच जल्लोषात बाप्पांना निरोप द्यायला हवा. प्रदूषण रोखण्यासाठी मूर्ती दान करा, मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी प्रत्येक भाविकांनी घ्यावी असं आवाहन अभिनेते अभिजीत खांडकेकर यांनी केलंय. तर या दहा दिवसांच्या काळात ध्वनिप्रदूषण होऊन इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ, असं अभिनेत्री सुखदा खांडकेकर म्हणाल्या.