राजकोट INDW vs IREW 3rd ODI Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 15 जानेवारी (बुधवार) रोजी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. भारताय संघानं मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता हा सामना जिंकत भारतीय संघ क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल तर आयरिश संघ सामना जिंकत आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरेल.
दुसऱ्या वनडेत काय झालं : तत्पुर्वी आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 5 विकेटच्या मोबदल्यात 370 धावांचा मोठा डोंगर उभा केला. या डावात जेमिमा रॉड्रिग्जनं 91 चेंडूत 102 धावांची शानदार शतकी खेळी केली. तिच्याशिवाय, हरलीन देओलनंही 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर कर्णधार स्मृती मंनधानानं जलद सुरुवात करत 54 चेंडूत 73 धावा केल्या. प्रतिका रावलनंही 67 धावांचं योगदान देऊन भारताला मजबूत स्थितीत आणलं. लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला फक्त 32 धावांवर पहिला धक्का बसला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून गोलंदाजीपुढे आयर्लंड संघाला 50 षटकांत सात विकेट गमावल्यानंतर फक्त 254 धावा करता आल्या, यासह भारतानं 116 धावांनी सामना जिंकला.
All in readiness for the Third and Final ODI! 😎#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/na24IqReo1
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
खेळपट्टी कशी असेल : निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चारही वनडे सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला. ही विकेट प्रथम फलंदाजीसाठी योग्य दिसते, नंतरच्या टप्प्यात गोलंदाजांना काही मदत होईल. आतापर्यंत या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. मात्र नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना मदत करु शकतो. पण तरीही ही विकेट फलंदाजीसाठी चांगली असेल.
For her fantastic hundred, Jemimah Rodrigues bags the Player of the Match award as #TeamIndia secure a comfortable win in the 2⃣nd ODI 👍 👍
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
Updates ▶️ https://t.co/zjr6BQyBQI#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/XtxNBUiNnX
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत महिला आणि आयर्लंड महिला यांच्यात आतापर्यंत एकूण 14 वनडे सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी खूपच प्रभावी राहिली आहे. टीम इंडियानं 14 पैकी 14 सामने जिंकले आहेत, जे त्यांची मजबूत आघाडी स्पष्टपणे दर्शवते. दुसरीकडे, आयर्लंड महिला संघानं भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.
A 1⃣1⃣6⃣-run win! 👏 👏
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
A superb effort from #TeamIndia to take an unassailable lead in the ODI series against Ireland in Rajkot! 🙌 🙌
Updates ▶️ https://t.co/zjr6BQyBQI#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/gwo462EDdY
भारत महिला आणि आयर्लंड महिला संघात तिसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?
भारत महिला आणि आयर्लंड महिला संघांमधील तिसरा वनडे सामना बुधवार, 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
Join us for the 3rd and final ODI of the series.
— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) January 14, 2025
Fans in Ireland/UK can watch on @tntsports 2.#BackingGreen #FuelledByCerta ☘️🏏 pic.twitter.com/oh37IXxelL
भारत महिला आणि आयर्लंड महिला संघांमधील तिसरा वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा?
भारतीय महिला आणि आयर्लंड महिला वनडे मालिका स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
भारतीय संघ : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, उमा छेत्री (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिस्ट, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितस साधू, साईमा ठाकोर, सायली सातघरे
आयर्लंड संघ : गॅबी लुईस (कर्णधार), अवा कॅनिंग, क्रिस्टीना कुल्टर-रेली, अलाना डालझेल, लॉरा डेलानी, जॉर्जिना डेम्पसी, सारा फोर्ब्स, अर्लीन केली, जोआना लॉफरन, एमी मॅग्वायर, लीह पॉल, ओर्ला प्रेंडरगास्ट, उना रेमंड-होई, फ्रेया सार्जेंट, रेबेका स्टोएकेल
हेही वाचा :