'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात बाप्पाचं ठिकठिकाणी आगमन; पाहा व्हिडिओ - Ganesh Chaturthi 2024 - GANESH CHATURTHI 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 7, 2024, 10:55 PM IST
मुंबई Ganesh Chaturthi 2024: भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशोत्सवाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. आज राज्यभरात विविध ठिकाणी गणरायाचं आगमन (Ganeshotsav 2024) झाल्यानं सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेत्यांच्या घरी लाडक्या बाप्पा विराजमान झाले आहेत. सोनाली कुलकर्णी ते स्वप्नील जोशी या मराठी सेलिब्रिटींच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
लालबागचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते लालबागचा राजाची प्राण प्रतिष्ठापणा करण्यात आली. तसेच गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात पुण्यातील मानाचे पाचही गणेशोत्सव मंडळात बाप्पा विराजमान झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी एक नाही तर दोन गणरायाची स्थापना करण्यात आली.