'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष; 'दगडूशेठ' गणपतीची आगमन मिरवणूक, पाहा ड्रोन व्हिडिओ - Ganesh Chaturthi 2024 - GANESH CHATURTHI 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 7, 2024, 4:25 PM IST
पुणे Ganesh Chaturthi 2024 : देशभरात आज गणेश चतुर्थीचा उत्साह (Ganeshotsav 2024) पाहायला मिळतो आहे. यावेळी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagadusheth Ganpati Pune) आगमन मिरवणूक (Ganpati Miravnuk) काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...च्या जयघोषात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती शिवमंदिराच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं ट्रस्टच्या १३२ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला.
शिवमंदिराच्या प्रतिकृतीमध्ये गणपती विराजमान : आज सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिर प्रतिकृतीमध्ये हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्याहस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी या आगमन मिरवणुकीत काढण्यात आलेला ड्रोन व्हिडिओ पाहूयात...