परतवाडा येथील सदर बाजारात भीषण आग, आगीत लाखोंचं नुकसान - Patrwada Sadar Bazar Fire - PATRWADA SADAR BAZAR FIRE
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 29, 2024, 10:52 PM IST
अमरावती Patrwada Sadar Bazar Fire : दिवसेंदिवस तापमान वाढत असतानाच गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास परतवाडा शहरातील सदर बाजार येथील बंटी कोठारी यांच्या पारसनाथ हातमाग या व्यावसायिक प्रतिष्ठानाला भीषण आग लागली. अचलपूर नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आगीत लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परतवाडा येथील सदर बाजारात कोठारी यांचं निवास तसंच प्रतिष्ठान एकाच ठिकाणी आहे. आजूबाजूला आणखी दुकानं असून अनेकांची घरंसुद्धा आहेत. सायंकाळी सात वाजता शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अचलपूर नगर पालिकेचे अग्निशमन बंब देखील सदर बाजार परिसरात दाखल झाले. सदर बाजार परिसरात आग लागताच या भागात नागरिकांची गर्दी उसळली. आगीचे डोंब, धूर आकाशात दुरून दिसत होते. आग विझवण्यासाठी चांदूरबाजार नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं प्रयत्न केला.