पाण्यासाठी शेतकऱ्यांचं संगमनेर-कोपरगाव महामार्गावर चक्का जाम आंदोलन - Farmer Protest
🎬 Watch Now: Feature Video
संगमनेर (अहमदनगर) Farmer Protest : संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे असंख्य शेतकऱ्यांनी आज संगमनेर-कोपरगाव महामार्गावरील चौफुलीवर चक्का जाम आंदोलन करुन पाण्याची मागणी केली आहे. अनेक वर्ष मंत्री राहणारे बाळासाहेब थोरात यांच्या उदासीनतेमुळं 45 वर्षापासून शेतकऱ्यांना झुलवत ठेवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केल्यामुळं वारतुक ठप्प झाली आहे. जोपर्यंत वरिष्ठ आधिकारी आंदोलन स्थळी येत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय.
ओढ्यातील पाणी चरीत कधी येणार : संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील काही गावांना निळवंडेच्या पाण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, दशके उलटून गेली तरी या गावात निळवंडे धरणाचं एक थेंबही पाणी मिळालं नाही. तर नाशिक जिल्ह्यातील भोजापूर धरणाचा पाण्यावर सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गणिते अवलंबून आहेत. तर ओढ्यातील पाणी चरीत कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.