पुण्यात ईद-उल-अझा तथा बकरी ईद सामूहिक नमाज पठण करून उत्साहात साजरी - Bakri Eid - BAKRI EID
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-06-2024/640-480-21728795-thumbnail-16x9-pushpa.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jun 17, 2024, 12:21 PM IST
पुणे - Bakri Eid 2024 : आज देशभरात सर्वत्र ईद उल-अझा तथा बकरी ईद साजरी होत आहे. पुण्यात देखील बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदानातील ईदगाह येथे आज सकाळच्या सुमारास सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव नमाज पठण साठी उपस्थित होते. नमाज पठण नंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
जगभरात आजच्या दिवशी मुस्लिम बांधव बकरी ईद साजरी करतात. ही ईद हजशी संबंधित असते. या दिवशी जगातील लाखो मुस्लीम पवित्र मक्का शहराला भेट देतात. या दिवशी नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देतात आणि मग बकऱ्याची कुरबानी देतात.
बकरी ईद म्हणजे काय..?
इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम हे एक असून एके काळी अल्लाहने हजरत इब्राहिम यांची परीक्षा घेतली. ज्यामध्ये त्यांना सर्वांत प्रिय गोष्टीचं बलिदान द्यायला सांगितलं. यावर इब्राहिम यांनी आपला प्रिय मुलगा इस्माईलचं बलिदान द्यायचं ठरवलं आणि जेव्हा हजरत इब्राहिम यांनी आपल्या मुलाला कुर्बानीसाठी आणलं तेव्हा त्रास होऊ नये म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली आणि अल्लाहने इस्माईलच्या जागी एक बकरा ठेवला. अशी एक कथा प्रचलीत आहे. याचाच एक भाग म्हणून दरवर्षी बकरी ईद निमित्त कुर्बानी दिली जाते.
हेही वाचा -
छोट्या मुलांसाठी आलिया भट्टनं 'पिक्चर बुक' केलं लॉन्च - Alia Bhatt
लग्नाआधी सासरच्या मंडळींना भेटली सोनाक्षी सिन्हा, पाहा फोटो - Sonakshi Sinha wedding
वरुण धवननं 'फादर्स डे'वर मुलीची पहिली झलक केली शेअर, पाहा फोटो - varun dhawan