"आता पंतप्रधान मोदींना पाजणार चहा", बिल गेट्स सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉली चायवाल्याची प्रतिक्रिया - Dolly Chaiwala Bill Gates

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 8:45 PM IST

नागपूर Bill Gates enjoy tea made by Dolly Chaiwala : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. बिल गेट्स यांनी बुधवारी (28 फेब्रुवारी) आपल्या इन्स्टाग्रामवरुन नागपूरमधील प्रसिद्ध 'डॉली चायवाला' सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ते चहाचा आस्वाद घेताना दिसताय. हा व्हिडीओ शेअर करत बिल गेट्स यांनी भारतामध्ये प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा दिसून येतो, असं म्हणत भारताचं कौतुक केलंय. या व्हिडिओ संदर्भात  माध्यमांना प्रतिक्रिया देत डॉली म्हणाला की, "मी माझ्या मित्रांसोबत हैदराबादला गेलो. तिथं काही विदेशी लोकांसोबत शूट करायचंय एवढचं मला माहित होतं. मी दोन दिवस तिथं शूट केल्यानंतर काल नागपूरला परतलो. पण, मी तिथे कुणासोबत शूटिंग केलं याची अजिबात मला माहिती नव्हती. आज माझा आणि बिल गेट्स यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. तेव्हा मला कळलं की मी कुणासोबत शूट केलंय. मला आज खरंच खूप आनंद होतोय." तसंच भविष्यात जर मला संधी मिळाली तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनवण्याची इच्छा असल्याचंही यावेळी डॉली म्हणाला. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.