बहिणीच्या पराभवाचा भावाला धक्का; धनंजय मुंडे म्हणाले, पंकजा मुंडेंचा पराभव माझ्यासाठी दुःखदायक - Beed Lok Sabha Result 2024 - BEED LOK SABHA RESULT 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 15, 2024, 9:57 AM IST
बीड Dhananjay Munde News : बीड लोकसभा निवडणुकीत भाजपाला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलंय. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, "बीड लोकसभा निवडणुकीत काय घडलं हे तुम्हाला माहिती आहे. कधीच अशा पद्धतीची निवडणूक झाली नाही. मी स्वतः या निवडणुकीची जबाबदारी घेतली असून हे माझ्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. आम्ही जात पात न पाहता राजकारण करतो. जातीय समीकरण, आरक्षण यावर निवडणूक होत असताना, पिकांना भाव नसणं हा मुद्दाही महत्वाचा ठरला. मात्र, निकाल लागल्यानंतर पराभव झाला म्हणून काहींनी आत्महत्याही केल्या. हे सगळं थांबलं पाहिजे. आपलं कुटुंब उघड्यावर पाडून जाणं चुकीचं आहे. येणाऱ्या काळात अशा घटना घडू नयेत. या घटनेमुळं वेदना होत आहेत. लोकसभेत जे व्हायचं होतं ते झालं. विधानसभेत काय होईल हे आता सांगता येत नाही."