हनुमान जयंती 2024 ; शिर्डीत 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा: इतक्याच तरुणांना उचलता आला 'बजरंग गोटा' - Hanuman Jayanti 2024 - HANUMAN JAYANTI 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 23, 2024, 2:34 PM IST
शिर्डी Hanuman Jayanti 2024 : साई बाबांच्या मंदिर परिसरातील हनुमान मंदिरासमोर शक्तीचं प्रतिक असलेल्या 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 11 तरूणांनी यशस्वीपणे बजरंग गोटा उचलला आहे. सालाबादप्रमाणं यंदाही क्रांती युवक मंडळाच्यावतीनं श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. क्रांती युवक मंडळाकडून दरवर्षी शिर्डीच्या साईमंदीराजवळील दक्षीण मुखी हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव उत्सव मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात आला. पहाटे साडेसहा वाजता श्रींच्या मूर्तीला गंगेच्या पाण्यानं मंगलस्नान घालण्यात आलं. त्यानंतर महाआरती करून भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. सकाळी 10 वाजता हनुमान मंदिरासमोरील शक्तीचं प्रतीक असलेला 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या सुरवातीला शिर्डी ग्रामस्थांचा हस्ते बजरंग गोटा पूजन करण्यात आलं. यावेळी तरुणांनी मोठ्या जोशात जय श्रीराम आणि हनुमानाचा जयजयकार करत 50 तरुणांनी हा गोटा उचलण्याचा प्रयत्न केला. त्यात एकूण 11 तरुणांनी हा 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलला. यामध्ये सचिन तांबे, सुरेश सुपेकर, राजेंद्र पांचाल, समाधान बनकर, सोपान त्रिभुवन, सागर बेलदार, यश चित्ते, सुदर्शन वेर्णेकर, अमोल रोकडे, सचिन चित्ते आदींनी सहभाग घेतला. शेवटी सचिन तांबे यांनी गोटा उचलून स्पर्धेचा समारोप केला.