निवडणुकां होऊ द्या... युद्ध करून पाकव्याप्त काश्मीरसह भारताचा नकाशा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही; दीपक केसरकर यांचं मोठे वक्तव्य - Deepak Kesarka - DEEPAK KESARKA
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 6, 2024, 3:29 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Deepak Kesarkar : आज पाकिस्तानची भारताकडं वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होत नाही. एक काळ ते आपल्या ताब्यातील काश्मीर घेण्याची स्वप्ने पाहात होते. पण आज पाकव्याप्त काश्मीरमधील लोक मोदींसारखे पंतप्रधान हवेत असं युट्युबवर बोलताना दिसतात. आपल्या देशाचा नकाशा पाकव्याप काश्मीरसह संपूर्ण भारताचा आहे. ज्याप्रमाणे अयोध्येतील श्री राम मंदिर (Ayodhyan Ram Mandir) झालं. 370 कलम हटवलं त्याप्रमाणं एकदा निवडणुका (Lok Sabha Election 2024) होऊ द्या. युद्ध केल्याशिवाय भारताचा नकाशा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, असं मोठं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. श्रीरामपूरमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे (sadashiv lokhand) यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथील सभेत बोलताना केसरकर यांनी हे विधान केलंय.