महाराष्ट्रात पुणे खास, इथं आहेत फक्त डास; पाहा व्हिडिओ - mosquitoes in Pune
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 12, 2024, 9:52 AM IST
|Updated : Feb 12, 2024, 12:20 PM IST
पुणे Mosquitoes in Mula Mutha Riverbed : दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डासांचा वावर पाहायला मिळतोय. हा व्हिडिओ पुण्यातील केशवनगर मुंढवा खराडी परिसरातील नदीपात्रातील असल्याची माहिती समोर आलीय. केशवनगरच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात डास पाहायला मिळत आहेत. पुण्यातील मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साठलेल्या जलपर्णी, तसंच या वाढलेल्या जलपर्णींमुळे या परिसरात डास, मच्छर, कीटक आणि माश्यांचं प्रमाण वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या डासांमुळं मोठ्या प्रमाणावर येथील स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. महानगरपालिका प्रशासनानं यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात येतीय. या डासांचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने नागरिक त्रस आहेत.