"... तुझा अभ्यास कमी आहे, पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिमांना आरक्षण मिळालं" - छगन भुजबळ - Chhagan Bhujbal News - CHHAGAN BHUJBAL NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 24, 2024, 3:46 PM IST
नाशिक Chhagan Bhujbal News : मराठा आरक्षणावरून राज्यात भुजबळ विरुद्ध जरांगे वाद चांगलाच तापलाय. अशातचं जरांगे पाटील यांनी मुस्लिमांनाही आरक्षण मिळावं अशी मागणी केली होती. त्यावरून मंत्री छगन भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले जरांगेचा अभ्यास कमी आहे. त्यांनी आधी अभ्यास करावा. 25 वर्षांपूर्वीच मुस्लिमांना आरक्षण मिळालं आहे. मुस्लिम समाजातील ओबीसी घटकातील जातींना आरक्षण देण्यात आलं आहे. त्यावेळी अभिनेते दिलीप कुमार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. जरांगेंना काहीही माहिती नाही. बोलायचं म्हणून ते बोलतात. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी ते काहीही बोलतात, असा टोला त्यांनी जरांगे यांना लगावला आहे. आमदारांना निधी वाढून मिळणार असल्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले की, अजून कोणत्याही पक्षाच्या आमदाराला निधी वाढवून मिळाला नाही. विकासकांसाठी पैसे मिळतात उगाच मोठ्या प्रमाणात दान मिळणार अशा चर्चा सुरू आहे. आचारसंहितेमुळं सर्व निर्णय पेंडीग आहेत.