भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद, फुटेजमध्ये स्पष्ट दिसतो गोळीबार - भाजपा आमदार गणपत गायकवाड
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 3, 2024, 3:57 PM IST
ठाणे BJP MLA Ganpat Gaikwad Firing : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरीरातून तब्बल 6 गोळ्या काढण्यात आल्या आहेत. उल्हासनगरमधील 'हिल लाईन' पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड (शिवसेना शिंदे गटाचे नेते) तसंच राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांना लक्ष्य करून गोळ्या झाडल्या,” असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी म्हटलं आहे.