पुण्यात रक्ताचा तुटवडा; रक्तपेढ्यांमध्ये फक्त 4 ते 5 दिवसांचा रक्तसाठा, रक्तदान करण्याचं आवाहन - BLOOD SHORTAGE IN PUNE
🎬 Watch Now: Feature Video


Published : Dec 3, 2024, 10:54 PM IST
पुणे : पुणे शहरात सध्या रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तपेढ्यांमध्ये फक्त 4 ते 5 दिवसांचा रक्तपुरवठा असल्यानं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आवाहन रक्तपेढी तसंच रुग्णालयामार्फत करण्यात आलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या असून निवडणुकीमुळं अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं नाही. वातावरणात देखील बदल झाल्यानं ज्येष्ठांसह नागरिकांमध्ये देखील वातावरण बदलाचे आजार वाढल्यानं व नियमित रक्तदाते उपलब्ध नसल्यानं ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कमी झालेली रक्तदान शिबिरे आणि डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या यामुळं रक्ताची मागणी वाढली आहे. पुण्यामध्ये दररोज 1500 रक्तपिशव्यांची गरज असते, पण त्यापैकी फक्त 500 ते 600 रक्तपिशव्या उपलब्ध होत आहेत, तर दिवसभरात किमान 50 रक्तदात्यांची गरज असताना फक्त 15-20 दातेच रक्तदान करत आहेत. रक्ताचा तुटवडा ही गंभीर समस्या असून दर तीन महिन्यांला रक्तदान शिबिरं आयोजित केली पाहिजेत. त्यामुळं रक्ताचा साठा वाढेल, अस रक्ताचे नाते ट्रस्ट अध्यक्ष राम बांगड यांनी सांगितलं.