'बिग बॉस'मराठी फेम सूरज चव्हाण, अभिजीत सावंतनं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; पाहा व्हिडिओ - SIDDHIVINAYAK TEMPLE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 8, 2024, 12:49 PM IST
मुंबई : लोकप्रिय मराठी कार्यक्रम 'बिग बॉस मराठी 5' चा ग्रँड फिनाले रविवारी (6 ऑक्टोबर) पार पडला. 'टॉप 6' स्पर्धकांमधून सूरज चव्हाणनं आपला जलवा दाखवत या सीझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता झाल्यानंतर 'बिग बॉस'ची ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेला. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत सूरजनं दर्शन घेतलं. सूरजबरोबर 'बिग बॉस' मराठीचा उपविजेता ठरलेला अभिजीत सावंत देखील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेला होता. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर सूरज आणि अभिजीतनं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेल्या सूरज आणि अभिजीतला पाहण्यासाठी तसंच त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं.