मतमोजणीसाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट; मतमोजणी केंद्राचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा - Lok Sabha Elections 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 2, 2024, 10:28 PM IST
बीड Lok Sabha Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. चार जूनला बीडमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात देखील मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. याच ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल, लॅपटॉप किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आलीय. मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. याबाबत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (Nandkumar Thakur) यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं आढावा घेऊन पाहणी केलीय. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून 4 जून रोजी वाहतुकीत देखील बदल केला गेलाय. तर जिल्ह्यात मनाई आदेश देखील लागू केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं साडेचारशे उपद्रवींना आयडेंटिफाय केले असून त्यातील सर्वच लोकांना नोटीसी देण्यात आल्या आहेत. तर पोलिसांची विशेष करडी नजर असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं.