एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शरदचंद्र; पुण्यात शरद पवारांच्या समर्थनात झळकले बॅनर्स - Sharad Pawar Banners
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 8, 2024, 7:10 AM IST
पुणे Sharad Pawar Banners : गुरूवारी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निकाल दिल्यानंतर राज्यभर अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला, तर शरद पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. पुणे शहरात राष्ट्रवादी युवक कोथरूड (शरद पवार गटाकडून) अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी शरद पवार यांच्या समर्थात ठीक ठिकाणी बॅनर्स लावले. आता या बॅनरची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. या बॅनरमध्ये 'फिर हेरा फेरी हुकूमशाही पद्धतीनं पक्ष आणि चिन्ह मिळवाल'. पण लोकांच्या मनात घर कसं कराल. जोर जबरदस्तीनं अन्याय करू शकता, पण लोकांचं प्रेम मिळू शकत नाही. 'उठ मित्रा जागा हो, या अन्यायाच्या विरोधातल्या लढाईचा धागा हो'. 'एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शरदचंद्र.'आमच्यासाठी शरदचंद्र पवार म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरदचंद्र पवार' अश्या आशयाचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले.