"2000 रुपये नको, आमच्या सुरक्षेसाठी एखादी योजना आणा", संतप्त महिलांची सरकारकडे मागणी - Badlapur School Case - BADLAPUR SCHOOL CASE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 20, 2024, 11:01 PM IST
बदलापूर : बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे संतप्त झालेल्या बदलापुरातील नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. पहाटे सहा वाजल्यापासून संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केले आहे. "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडकी बहीण सुरक्षा योजना शासनाने आणावी. किती वेळ मेणबत्ती जाळणार, एक वेळ बलात्कारीलाच जाळूया, न्याय द्या." असे फलक घेत महिला रेल्वेच्या ट्रॅकवर उतरल्या होत्या. "जे नगरसेवक, आमदार, खासदार मत मागायला येत होते. ते आता कुठे गेले? जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही किंवा आरोपीला आमच्या ताब्यात देत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही," अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी यावेळी दिल्या.