अशोकराव चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर, नांदेड येथील बंगल्यावर शुकशुकाट; पाहा व्हिडिओ - Ashok Chavan Resigned

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 9:09 PM IST

नांदेड Ashok Chavan Nanded Bungalow :  राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या नांदेड येथील बंगल्यासमोर शुकशुकाट बघायला मिळत आहे. अशोकराव चव्हाण यांच्या एकाही कार्यकर्त्यानं अद्याप समोर येऊन प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण बघायला मिळतंय. तर अशोकराव चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे, विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर, माजी नगरसेवक प्रकाश मुत्था यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून अशोकराव चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. भाजपा प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नांदेड दौऱ्यावर असताना यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सोमवारी (12 फेब्रुवारी) अशोकराव चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.