आषाढी एकादशी 2024; नाशिकच्या कलाकारांची अनोखी भक्ती, पेन्सिलच्या लीडवर साकारली पांडुरंगाची सुबक मूर्ती... - Beautiful Idol of Vitthal On Pencil

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 7:14 PM IST

नाशिक Beautiful Idol of Vitthal On Pencil : आषाढी एकादशीच्या (Ashadhi Wari 2024) निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली. तर नाशिकच्या जीवन जाधव (Artist Jeevan Jadhav) या लीड कार्विंग आर्टिस्टने पेन्सिलच्या टोकावर विठ्ठलाची मूर्ती साकारत पांडुरंगा प्रति आपली श्रद्धा अर्पण केली आहे. जाधव यांना ही मूर्ती साकारण्यासाठी सात ते आठ तासाचा कालावधी लागला आहे. जीवन जाधव यांनी आतापर्यंत अनेक कलाकृती पेन्सिलच्या टोकावर साकारत, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाशिकचं नाव उंचावलं आहे. जीवन यांनी आतापर्यंत पेन्सिलच्या लीडवर अयोध्येतील रामलल्ला, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, लालबागचा राजा, महेंद्रसिंह धोनी, सरदार वल्लभभाई पटेल, मायकल जॅक्सन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती, विठ्ठल मूर्ती, नाना पाटेकर अशा शंभरहून अधिक सुबक मूर्ती साकारल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.