ठाण्यातील सेक्स रॅकेट प्रकरणात अटक महिला दलालाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त - Thane Sex Racket Case Update - THANE SEX RACKET CASE UPDATE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 26, 2024, 9:15 PM IST
ठाणे Thane Sex Racket Case Update : ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील लुईसवाडी येथील शरणम हॉटेलमध्ये विदेशी तरुणींना घेऊन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलाल सालिका उदोम वाबनग्लब (४४) हिला शुक्रवारी (२१ जून) (एएचपीसी) अनैतिक मानवी तस्करी पथकानं अटक केली. यावेळी पथकाकडून देहव्यापारात गुंतलेल्या तीन विदेशी तरुणींची सुटका करण्यात आली. याच प्रकरणात आणखी एक आरोपी बागडी अब्दुलाह मुघड साद याला मंगळवारी (२५ जून) रोजी अटक करण्यात आली.
आरोपी सालिकाकडे थायलंडचा व्हिसा : अटक केलेल्या थायलंड येथील तीन तरुणींची रवानगी ही महिला सुधारगृहात करण्यात आलेली आहे. तर अटक सालिका हिच्याकडे थायलंड देशाचा व्हिसा आणि मुदत संपलेला पासपोर्ट जप्त करण्यात आला. सोबत भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्डही हस्तगत करण्यात आलं. थायलंड निवासी महिलेला भारतीय ओळखपत्र आधार आणि पॅनकार्ड कुणी बनविले, याचा शोध घेतल्यानंतर पथकाने मंगळवारी (२५ जून) रोजी बागडी अब्दुलाह मुघड साद या बनावट दस्त बनविणाऱ्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडे येमेन देशाचा मुदत संपलेला पासपोर्ट आणि व्हिसा आढळला. त्यामुळे अटकेतील दोन्ही आरोपींच्या विरोधात दाखल वेश्या व्यवसाय गुन्ह्यात बनावट दस्ताद्वारे भारतात बेकायदेशीर वास्तव्याच्या गुन्ह्याची वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.