अमरावतीहून मराठवाड्यामार्गे पुण्याला नवीन रेल्वे; खासदार नवनीत राणांनी दाखविला हिरवा झेंडा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 10, 2024, 10:56 AM IST
अमरावती Amravati to Pune special train : अमरावतीवरुन पुण्याला मराठवाड्यामार्गे नवी रेल्वे सुरू करण्यात आलीय. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता खासदार नवनीत राणा आणि डॉ. अनिल बोंडे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलंय. यापूर्वी अमरावतीहून पुण्यासाठी भुसावळ मनमाडमार्गे एक रेल्वे नियमित रात्री साडेदहा वाजता सुटते. तर ही गाडी आठवड्यातून शनिवार आणि सोमवार असे दोन दिवस धावणार आहे. अमरावती पुणे ही नवी गाडी अकोला, वाशिम, हिंगोली, पुर्णा, परभणी, परळी, लातूर या मार्गानं म्हणजे मराठवाड्यातून पुण्याच्या दिशेनं जाते. अमरावतीवरुन मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी सोयीची असल्याचं खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. 2019-20 मध्ये मराठवाड्यातून जाणारी अमरावती पुणे ही गाडी सुरू करण्यात आली होती. कोरोना काळात मात्र ही गाडी बंद झाली. तीन वर्षांपासून बंद असणारी ही गाडी आता पुन्हा नव्यानं अमरावतीवरुन पुण्याला धावायला लागलीय.