उमेदवारी देऊन चूक केली तर पक्षात येण्यासाठी लपून छपून निरोप का दिले? अमोल कोल्हे यांचा अजित पवार यांना सवाल - अजित पवार
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 4, 2024, 6:58 PM IST
पुणे MP Amol Kolhe : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष रंगलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आव्हान दिलं आहे. त्यानंतर आज (4 मार्च) अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार यांनी आपल्या शैलीत खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. याला प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हे म्हणाले की, "अजित पवार ज्या खासदारांविषयी बोलले त्या खासदारांपैकी एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही. मला दोन वर्षांत राजीनामा द्यायचा असता तर मी संसदेत उपस्थित राहिलो नसतो आणि जनतेचे प्रश्नही मांडले नसते. याचा त्यांनी विचार करावा."
मग तो निरोप का पाठवला? खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, "देशात मोदींची हवा आहे, असं सातत्यानं अजित पवारांकडून बोललं जातं; पण पाटणा येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला १५ लाखांचा जनसमुदाय होता. तसंच शिरूर लोकसभेसाठी मी तुमच्या पक्षात यावं म्हणून दहा दहा वेळा लपून छपून निरोप देत होता. मग का म्हणून तो निरोप देत होता? शरद पवार यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन."