अंबरनाथमध्ये झोपडपट्टीला भीषण आग; ९ गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे अनेक झोपड्या जळून खाक - झोपडपट्टीला आग
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 26, 2024, 5:36 PM IST
ठाणे Ambernath Fire Incident : अंबरनाथ स्टेशन परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीला आज (26 फेब्रुवारी) भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक होऊन अनेक गरिबांच्या संसाराच्या साहित्याची राख रांगोळी झाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या सर्कस ग्राउंडवर नव्यानं झोपडपट्टी उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या एका झोपडीत अचानक आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीची भीषणता एवढी जास्त होती की, या झोपड्यांमध्ये असलेले गॅस सिलिंडरचे मोठे स्फोटदेखील झालेत. या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग आणखीनच भडकली होती. आगीच्या घटनेची नोंद स्थानिक अंबरनाथ पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.