राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क; पाहा व्हिडिओ - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 20, 2024, 8:57 PM IST
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील उमेदवारांसह इतर नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आता उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी जनतेनं कौल कोणाच्या बाजूनं दिला आहे हे स्पष्ट होणार आहे.
'यांनी' बजावला मतदानाचा हक्क : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा होती. राज्यातील प्रत्येक भागामध्ये मतदान पार पडलं. लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावून उभे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले आणि रामदास आठवले यांनी सहकुटुंब मतदान केलं. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.