तपासणीकरिता आलेल्या विद्यार्थिनीचा डॉक्टरकडून विनयभंग, डॉक्टरांसह महिला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल - Srirampur News - SRIRAMPUR NEWS
🎬 Watch Now: Feature Video


Published : Aug 7, 2024, 4:19 PM IST
श्रीरामपूर (अहमदनगर) : रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यावर डॉक्टरनं विनयभंग केल्याची घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार डॉक्टराविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं वैद्यकीय क्षेत्रासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर शहरातील साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महाविद्यालयात शिक्षण घेणारी पीडित विद्यार्थिनी वसतीगृहात राहते. ती आजारी असल्यानं श्रीरामपूरातील नेवासा रोडवर असलेल्या साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मैत्रिणींबरोबर उपचार घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी डॉ. रविंन्द्र कुटेनं तिच्याशी गैरवर्तन केलं. त्यानंतर डॉक्टर कुटेंनी मुलींना शिवीगाळ करत झाडूनं मारहाण केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीचा कुटुंबीयांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चं कलम 64, 74, 115 (2 ), 35 ,2 , 3 (5 ) प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. तांत्रिकदृष्ट्या बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन देखमुख यांनी दिलीय.