आई-वडिलांना नमस्कार करता तसं आज मतदान करा-अभिनेता सुबोध भावे - MAHARASHTRA ASSEMBLY VOTING
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 20, 2024, 11:32 AM IST
पुणे: राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभर मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी सकाळपासूनच थंडीतही नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात अभिनेता सुबोध भावे आणि त्यांच्या पत्नी यांनी बुधवार पेठेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अभिनेता सुबोध भावे म्हणाले, " जेव्हापासून मला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे, तेव्हापासून मी मतदानाचा हक्क बजावत आहे. आजपर्यंत मी नेहेमी मतदान केलं आहे. मी काल फलटणमध्ये शूटसाठी होतो. फक्त मतदान करण्यासाठी पुण्यात आलो आहे. मतदान करून पुढे शूटिंला जाणार आहे. मी कुठेही असलो तरी मतदानासाठी पुण्यात नेहेमी येत असतो. लोकशाहीचा हा हक्क सर्वसामान्य नागरिकांचा आहे. हा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे. आपणच मतदानाचा हक्क बजावला नाही आणि व्यवस्था बदलली तर ओरडून काहीही होणार नाही. जसं सकाळी उठल्यावर परमेश्वराला, आई-वडिलांना नमस्कार घालतो तसं आज आपला मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा, असं आवाहन यावेळी भावे यांनी केलं.