अभिषेक घोसाळकरांचा गोळीबारात मृत्यू; फायरिंगचा VIDEO आला समोर, आरोपीचीही आत्महत्या - अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 10:55 PM IST

मुंबई Abhishek Ghosalkar Firing : दहीसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. फेसबुक लाईव्ह सुरू असताना घोसाळक यांच्यावर मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीनं गोळीबार केला आहे. त्यामुळं अभिषेक घोसाळकर यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसनं स्वत:वरही गोळी झाडली. यामध्ये मॉरिसचाही मृत्यू झाला. आरोपी मॉरिसनं त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. आपण समाजासाठी एकत्र आलो, असं तो बोलताना दिसत आहेत. त्यानंतर अभिषेक घोसाळकर आपली भूमिका मांडतात. घोसाळकरांनी भूमीका मांडल्यानंतर ते जागेवरून उठत असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.