शिर्डी नगरपरिषद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांची लूट; रहिवासी दाखल्यासाठी 50 रुपयांची मागणी - Mukhyamantri Ladki Bahin Yojana
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 4, 2024, 2:49 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Mukhyamantri Ladki Bahin Yojana : पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केलीय. त्यानंतर कागपत्रांची जुळवाजुळव करताना सरकारी कार्यालयात महिलांची अक्षरशः गर्दी होत आहे. यातच काही ठिकाणी पैसे घेत असल्याचे आरोप होत असल्यानं, मुख्यमंत्र्यांनी यात कोणीही पैसे घेवू नये अन्यथा कारवाई केली जाईल असं स्पष्ट जाहीर केलंय.
रहिवाशी दाखल्यासाठी आकारले पन्नास रुपये : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी तसंच दाखल्यासाठी एक पैसाही लागणार नसल्याचं विधिमंडळाच्या अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलंय. मात्र, राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतच नगरपरिषदेत (Shirdi Nagar Parishad) रहिवासी दाखल्यासाठी चक्क पन्नास रुपये आकारले जात असल्याचं दिसून येत आहे. एकीकडं सरकार एक रुपया लागणार नसल्याचं सांगतय, तर त्याच सरकारी यंत्रणेत कागदपत्रं आणि दाखल्यांसाठी पैसे घेतले जात असल्यानं महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.