बीडमध्ये शंभरावं विभागीय नाट्य संमेलन, हलगीच्या तालावर कलाकारांनी धरला ठेका
🎬 Watch Now: Feature Video
बीड Akhil Bharatiya Natya Sammelan Beed : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या नाट्यदिंडीस मोठया उत्साहात आज शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी बीडमध्ये सुरुवात झाली. या नाट्यदिंडीसाठी अखिल भारतीय मराठी ना्टय परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते संदीप पाठक, सुधीर निकम, विजू खोटे, यांच्यासह नाट्य परिषदेच्या सदस्यांची उपस्थिती मोठी उपस्थिती होती. यावेळी संदीप पाठक आणि आणि सुधीर निकम यांनी हलगी वाजवत नाट्य दिंडीचा आनंद घेतला. तर, हलगीच्या तालावर नाट्य दिंडीमध्ये संदीप पाठक यांचा गावठी डान्स पहायला मिळाला. या नाट्यदिंडीमध्ये रथ सजवण्यात आला होता. त्यामध्ये बालाकारांचाही समावोश होता. वेगवेगळ्या वेशभूषा करून, विद्यार्थी सहभागी झाले होते. यात लोककलेचा जागर करणाऱ्या लोक कलावंतांच्या वेशभूषेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होते.