ETV Bharat / state

निवडणुकीचं काम नको रे बाबा! 'इलेक्शन ड्यूटी' रद्द करण्यासाठी विविध कारणं घेऊन कर्मचारी निवडणूक विभागात - Lok Sabha Elections 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 2:57 PM IST

Lok Sabha Elections 2024 : निवडणूक आली की सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम सोपवण्यात येतं. मात्र नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचं काम नको रे बाबा असं म्हटल्याचं दिसून येतंय. आचारसंहिता लागल्यापासून रोज साधारण 8 ते 10 कर्मचारी निवडणुकीचं काम रद्द करण्यासाठी अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात येत आहेत.

निवडणुकीचं काम नको रे बाबा! निवडणुकीचं काम रद्द करण्यासाठी विविध कारणं घेऊन कर्मचारी निवडणूक विभागात

नाशिक Lok Sabha Elections 2024 : नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 30 हजार कर्मचारी लागणार आहेत. या सर्वांना नियुक्तीपत्रही पाठवली आहेत. नियुक्ती कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात आलेत. मात्र निवडणुकीचं काम करण्यास उत्सुक नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून विविध कारणं दाखवून ड्युटी रद्द करण्यासाठी अर्ज केले जात आहेत. निवडणुकीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींची नावं दोन ठिकाणी आहेत, काहींना हृदयविकाराचा त्रास, उच्च रक्तदाब, मधुमेह शरीरातील विविध अंग दुखण्याचे आजार अशी कारणं पुढं करत आचारसंहिता लागल्यापासून रोज साधारण 8 ते 10 कर्मचारी निवडणुकीचं काम रद्द करण्यासाठी अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात येत आहेत.

अनेक कारणं घेऊन कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे : निवडणुकीचं काम रद्द करण्यासाठी कर्मचारी वेगवेगळी कारणं सांगतात. त्यामध्ये, चालताना धाप लागते, अतिश्रमानं चक्कर येते, हृदयाची शस्त्रक्रिया झालीय, उच्च रक्तदाब आहे, वयस्कर आई-वडिलांची जबाबदारी आहे अशी अनेक कारणं सांगून सरकारी खात्यातील कर्मचारी व अधिकारी निवडणुकीची कामं टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेकांना निवडणुकीच्या ड्युटीवर जाणं म्हणजे काम खूप करावं लागतं, त्यामुळं अनेकदा यासाठी कर्मचाऱ्यांची नकार घंटा असते. आपली ड्युटी रद्द व्हावी याकरता वशिले लावले जात आहेत. पुढार्‍यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करुन निवडणुकीचं काम रद्द करण्यासाठी दबाव आणला जातोय. त्यामुळं निवडणूक अधिकारी त्रस्त झाले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडं अर्ज करण्यासाठी गर्दी वाढत आहे. त्यामुळं निवडणूक अधिकारी वैतागले आहेत. निवडणुकीच्या कामांचं नियोजन करायचं की अर्ज स्वीकारायचे असा प्रश्न आता निवडणूक अधिकाऱ्यांना पडतोय. निवडणुकीचं काम टाळण्यासाठी शिक्षक वर्ग अधिक आग्रही असल्याचंही दिसून येतंय.

निवडणुकीचं काम टाळण्याची कारणं : वर्षभर शैक्षणिक कामं करत असताना ऐन सुट्टीच्या काळात देण्यात आलेलं निवडणुकीचं काम, मतदान केंद्रावर असलेल्या असुविधा, परिवारासोबत बाहेरगावी जाण्याचं नियोजन, घरात लग्नकार्य इतर धार्मिक कार्यक्रम, दूर अंतरावर होणारी नेमणूक, परिवारातील सदस्यांचा आरोग्याचा प्रश्न, मतदान प्रक्रियेत घोळ झाल्यास नोकरीवर गदा येण्याची भीती या कारणांमुळं कर्मचारी निवडणुकीचं काम टाळत असल्याचं समोर आलंय.

निवडणुकीचं काम रद्द करण्याचे निकष काय : केवळ चार कारणांसाठीच निवडणुकीचं काम रद्द होऊ शकतं असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यात ज्यांचं काम दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावलेलं आहे. जे कर्मचारी राजकीय पक्षांशी संबंधित आहेत (त्याचा पुरावा असणं गरजेचे), ज्यांनी निवडणुकीपूर्वीच परदेश प्रवासाचं बुकिंग केलंय. ज्यांना तीव्र हृदयविकाराचा त्रास, दुर्धर आजार आहे, संबंधित विभागाचा सीनियर अधिकारी आहे अशा कर्मचाऱ्यांचं निवडणुकीचं काम रद्द होऊ शकतं. मात्र या सर्वांचा पुरावा देणं गरजेचं असल्याचं उप निवडणूक जिल्हाधिकारी शशीकांत मंगरुळे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. दक्षिण मुंबईत महायुतीला पराभवाची भीती... कोणती आहेत कारणे? - South Mumbai lok Sabha constituency

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.