T20 विश्वचषकात भिडणार ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, मात्र सामना भारतासाठी महत्त्वाचा; 'इथं' पाहा लाईव्ह मॅच - AUSW VS NZW T20I LIVE IN INDIA
AUSW vs NZW Live Streaming : ICC महिला T20 विश्वचषकात आज ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे.
![T20 विश्वचषकात भिडणार ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, मात्र सामना भारतासाठी महत्त्वाचा; 'इथं' पाहा लाईव्ह मॅच AUSW vs NZW Live](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/08-10-2024/1200-675-22633312-thumbnail-16x9-aus.jpg?imwidth=3840)
![ETV Bharat Sports Team author img](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/sports-1716536519.jpeg)
Published : Oct 8, 2024, 12:56 PM IST
शारजाह AUSW vs NZW Live Streaming : ICC महिला T20 विश्वचषकाचा 10 वा सामना आज म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.
Frenemies 🤝#AUSvNZ preview 📲 https://t.co/J23mgmiqTj#WhateverItTakes #T20WorldCup pic.twitter.com/NYurDOOFiv
— ICC (@ICC) October 8, 2024
दोन्ही संघाची विजयी सुरुवात : ऑस्ट्रेलियन संघानं T20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयानं केली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 6 विकेट्सनं पराभव केला होता. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. दुसरीकडं, न्यूझीलंडनंही आपल्या मोहिमेची सुरुवात विजयानं केली आणि पहिल्या सामन्यात भारताचा 58 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन स्पर्धेत दुसरा विजय नोंदविण्याकडे न्यूझीलंडचं लक्ष असेल. परणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
न्यूझीलंडचा विजय भारतासाठी महत्त्वाचा : विशेष म्हणजे ज्या संघाविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता त्याच संघाला आज भारतीय संघ सपोर्ट करताना दिसणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी किवी संघाला विजयाची गरज आहे. खरं तर, भारतीय संघानं महिला T20 विश्वचषकाच्या गट टप्प्यातील आपले उर्वरित सामने जिंकले तरी उपांत्य फेरी गाठण्याची शाश्वती नाही. अशा समीकरणामागील मुख्य कारण म्हणजे संघाचा खराब नेट रन रेट -1.217 आहे. मात्र आजचा सामना किवी संघानं जिंकल्यास भारताला फायदा होऊ शकतो.
Familiar foes collide 💥#AUSvNZ preview 📝 https://t.co/DugVaOhsn7#T20WorldCup #WhateverItTakes pic.twitter.com/yaWvxldy0x
— ICC (@ICC) October 8, 2024
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : यापूर्वी ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला यांच्यात नेहमीच अटीतटीचे सामने झाले आहेत. पण सहा वेळा महिला T20 विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरुद्ध वरचष्मा दिसत आहे. T20 मध्ये दोन्ही संघ 52 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियानं 28 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडनं 21 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय एक सामना निकालाविना संपला. 2006 मध्ये खेळलेला त्यांचा पहिला सामना अनिर्णित राहिला.
खेळपट्टीचा अहवाल कसा असेल : शारजाह क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. या मैदानावर फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळते. या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना संथ वळण घेणाऱ्या गोलंदाजांचा वरचष्मा असतो. मात्र मैदान लहान असल्यानं त्याचा फायदा फलंदाजही घेऊ शकतात. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 135 धावांची आहे. इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य असू शकतो.
The big hitters at the #T20WorldCup 💥
— ICC (@ICC) October 8, 2024
More stats 📲 https://t.co/DgFsvsMTpV#WhateverItTakes pic.twitter.com/oTBBBjyBqO
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला सामना कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला सामना मंगळवार, 8 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला सामना कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 07:30 वाजता सुरु होईल.
Frenemies 🤝#AUSvNZ preview 📲 https://t.co/J23mgmiqTj#WhateverItTakes #T20WorldCup pic.twitter.com/NYurDOOFiv
— ICC (@ICC) October 8, 2024
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
न्यूझीलंड महिला संघ : सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टिरक्षक), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, हन्ना रो, फ्रॅन जोनास, लिघे केसपार्क, मॉली पेनफोल्ड
ऑस्ट्रेलिया महिला संघ : बेथ मूनी, ॲलिसा हिली (कर्णधार/यष्टिरक्षक), जॉर्जिया वेअरहॅम, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शट, डार्सी ब्राउन, ग्रेस हॅरिस, किम गर्थ, अलाना किंग, टायला व्लामिंक
हेही वाचा :