ETV Bharat / politics

देवेंद्र फडणवीस यांनी त्या अडीच वर्षांची काढली आठवण,"प्रचंड त्रास..."

देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड झाली आहे.

Devendra Fadnavis New CM
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची घेणार शपथ (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 11 hours ago

Updated : 8 hours ago

मुंबई- महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रपिदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सांभाळणार आहेत. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची भाजपा विधिमंडळ गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस उद्या सायंकाळी साडे पाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

Live Updates- भाजपाचे पक्ष निरीक्षक विजय रुपाणी म्हणाले, " देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपालांकडे महायुतीचे नेते 3 वाजता सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. महायुतीमध्ये सर्व खूष आहेत. एकनाथ शिंदे नाराज नाहीत."

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळ गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर अनुमोदन आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांनी दिलं. एकच प्रस्ताव आल्यानं सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ गटनेते पदी निवड झाल्याचं गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाजपाचे पक्षनिरीक्षक विजय रुपाणी यांनी सांगितलं.

भाजपाचे विधिमंडळ पक्षाचे नवनिर्वाचित गटनेते काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस म्हणाले, " एकमताने निवड केल्याबद्दल आभारी आहे. पंतप्रधान मोदींचा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मनापासून आभारी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करतो. आम्ही विरोधात बसलो होतो, तेव्हा अडीच वर्षात एकही आमदार सोडून गेला नाही. त्या अडीच वर्षात प्रचंड त्रास देण्यात आला. 2019 मध्ये जनतेनं दिलेला कौल हिसकावून घेण्यात आला. जनादेशाचा आनंद आहे. पण जबाबदारी वाढली आहे. जनादेशाचा सन्मान राखला जाईल. यंदाची निवडणूक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती."

  • पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक विखे, मेघना बोर्डीकर, योगेश सागर, संभाजी पाटील निलंगेकर, गोपीचंद पडळकर, दिलीप गोडसे, आशिष शेलार यांनीही प्रस्तावाला अनुमोदन दिले.

आझाद मैदानावर होणार शपथविधी सोहळा- महायुतीमध्ये 132 जागा जिंकून भाजपानं मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी नियोजन केलं आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, पियुष गोयल, शिवराज चौहान यांच्यासह सुमारे नऊ ते दहा केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे आणि एनडीएचे 19 मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळा हा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला 40 हजार ते 50 हजार लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. महायुतीकडून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाविकास आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत.

शपथविधी सोहळा कसा असणार?

  • भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या माहितीनुसार शपथविधी सोहळ्याला सुमारे 10,000 लाडकी बहिणी आणि 2,000 शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
  • सोसायट्यांचे सुमारे 5,000 अध्यक्ष आणि सचिव देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
  • सुमारे 2,000 व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
  • शपथसोहळा समारंभाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. हा शपथविधी सोहळा बस स्टॉप, चित्रपटगृहे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी एलईडी स्क्रीनवर पाहता येणार असल्याचे आमदार लाड यांनी सांगितलं.
  • सुमारे 100 साधू-महाराज, डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट्ससह व्यावसायिक, बॉलीवूड तारे, मराठी चित्रपट कलाकारांनाही शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.
  • जवळपास 10 हजार भाजप कार्यकर्ते 'एक है तो सुरक्षित है' असा लिखित संदेश असलेले टी-शर्ट घालणार आहेत. तर मराठी आणि हिंदी गायक देखील कार्यक्रमस्थळी सादरीकरण करणार आहेत. शपथविधी सोहळा सुरळीतपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि मुंबईत अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.

Last Updated : 8 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.