Video : परभणीत होलसेल साडी दुकानाला आग ; सर्व कापड जळून खाक - Fire at sari shop in Parbhani

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 22, 2022, 3:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

परभणी : परभणी येथील वसमत रस्त्यावरील जागृती हनुमान मंदिर जवळच्या श्रीहरी साडी डेपो ( Shrihari sari depot fire ) या साडीच्या होलसेल दुकानास आग ( Saree wholesale shop on fire ) लागली. मंगळवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दुकानातील साडी, इतर कपडा व फर्निचर जळून खाक झाले आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. दुकानातून धूर बाहेर निघत होता. त्यावेळी या महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना तो प्रकार लक्षात आला. त्यातील डॉ. विवेक नावंदर यांच्यासह इतर काही नागरिकांनी तातडीने दुकान मालकासह अग्निशामक दलास कळवले. त्यानंतर अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत या दुकानातून आगीचे व धुराचे लोळ बाहेर पडत होते. अग्नीशामक दलाच्या जवानांनी या दुकानाचे शटर तोडून आग आटोक्यात आणली. सुमारे दोन कोटीहून अधिकचे नुकसान - या आगीत दुकानातील साड्या व इतर रेडीमेड कपडा मालाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास सर्वच कपडा, साड्या आणि फर्निचर या आगीत जळून खाक झाले आहे. दुकानात सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिकचा माल असल्याची माहिती दुकानाचे मालक ऋषिकेश सावंत ( Shop owner Rishikesh Sawant ) यांनी दिली. तसेच ही आग मध्यरात्री साडेतीन ते चारच्या सुमारास शॉर्टसर्किटने लागली असावी ( Predict fire caused by short circuit ), असा अंदाज देखील सावंत यांनी व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तर दहाच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.