Elephant Ate Jackfruit : काय सांगताय काय...? चक्क 30 फूट उंचीवरील फणस हत्तीने खाल्ला! - हत्तीने खाल्ला उंच झाडावरील फणस
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - सोशल मीडियात एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पूर्ण क्षमतेने वाढलेला भला मोठा हत्ती उंच फणसाच्या ( Elephant ate Jackfruit ) झाडावरील फणस खाताना दिसत आहे. आजरा तालुक्यातील हलोळी गावात हा हत्ती पाहायला मिळाला असून एका फणसासाठी त्याने केलेली कसरत यामध्ये दिसते. सुरुवातीला झाडाला हलवून फणस पडण्याचा यामध्ये प्रयत्न करत असून त्यानेही पडत नसल्याने दोन्ही पायांवर उभे राहून तब्बल 30 फुटांवरील फणस त्याने खाल्ले आहेत. अतिशय दुर्मिळ असे हे दृश्य एका स्थानिकाने आपल्या कॅमेरात कैद केले आहे. हा एक अनोखा व्हिडिओ सद्या कोल्हापुरात चांगलाच व्हायरल होत आहे. आजरा तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे, मात्र अद्याप कुठला आहे हे अधिकृत समजले नाही.