Valsad Helicopter Rescue Operation : वलसाडमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत, हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरू, पाहा Video - Valsad Helicopter Rescue Operation Video
🎬 Watch Now: Feature Video
वलसाड (गुजरात) : गुजरातमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाला आहे. दरम्यान अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. वलसाडमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात बचावकार्य सुरू ( Valsad Helicopter rescue operation ) आहे. विशेष म्हणजे, राज्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने काही भागात दयनीय परिस्थिती निर्माण केली आहे, तरीही वलसाडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी तुंबल्याने स्थिती बिकट बनली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वलसाड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरल्याने 300 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. पावसाच्या पाण्यात अडकलेल्या 4 जणांसाठी हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.