Udayanraje Bhosale सातार्यातील दहीहंडीत उदयनराजेंचा जलवा अन तरूणाईचा जल्लोष, पाहा व्हिडिओ - उदयनराजे भोसले सातारा दहीहंडी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16164531-thumbnail-3x2-udayanraje-bhosale.jpg)
सातारा - 'स्टाईल इज स्टाईल' म्हणत कॉलर उडवणार्या खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंनी सातार्यातील दहीहंडीच्या कार्यक्रमात रॉयल एन्ट्री केली. त्यांच्या ग्रँड एन्ट्रीला तरूणांनी जल्लोषात दाद दिली. यावेळी छत्रपती उदयनराजेंनी मंचावरील दहीहंडी फोडून समोरच्या गर्दीतील तरूणांकडे पाहून 'तुम्ही माझी कॉलर आहात', असे म्हणत कॉलर उडवली. यावेळी मंचासमोरील गर्दीतून प्रचंड घोषणाबाजी झाली. उदयनराजेंच्या स्टाईलवर सातार्यातील तरूणाई नेहमीच फिदा असते. त्याचा प्रत्यय दहीहंडीवेळीही आला. सातार्यात खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहातर्फे तालीम संघाच्या मैदानावर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले udayanraje bhosale mitra samuh dahi handi utsav होते.
Last Updated : Aug 22, 2022, 11:24 AM IST